Sunday, July 6, 2014

आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला…
आवडेल मलाही पाऊस व्हायला…
न सांगता तुझ्या भेटीला यायला …
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला…
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला…
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला…

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
गंध होऊनी श् ‍वासात तुझ्या मिसळायला …
श्‍वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला…
काळ्या ढगांमधून पळून यायला…
अलगद तुझ्या कुशीत शिरायला…

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
नकळत हृदयात तुझ्या शिरायला …
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला ..
तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला ..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला…
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला…
आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला…
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला…

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला…
एकट्या मनाची सोबत करायला …
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला…
भाळशील का तू माझ्या या रुपाला सांग ना जमेल का तुला साथ द्यायला…
तरच आवडेल मला पाऊस व्हायला…

Friday, July 4, 2014

ह्या जगात खरच प्रेम असते का...

ह्या जगात खरच प्रेम असते का...

कधी कोण कोणासाठी झुरत का?
मग का तुटतात अचानक नाती.
मग का होतात मने वेगवेगळी
प्रेमाच्या नात्याला तितके महत्व नसते का?
कधी इज्जतीची पर्वा न करता,
घर सोडून पळतात.
कधी इज्जतीची पर्वा करत,
प्रेमाचा बळी देतात.
प्रेम हेच सर्व शिकवते का?

कधी प्रेम नाही मिळालं तर स्वतः मरतात.
कधी आपल्या प्रेमावर acid फेकतात.
प्रेम इतके निष्टुर असते का?
असे खुप प्रश्न आहेत त्याची उत्तरे नाहीत.
ह्या प्रश्नांची उत्तरे कधी काही असतील का?

ह्या जगात खरच प्रेम असते का...

रात्री जागून विचार करणं...

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं...

हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं...

गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..

तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुख दु:खात आपलं हसणं प्रेम असतं...

तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं ...

खरोखरच अस पण प्रेम असतं...

माझ्या स्वप्नात का येते ती...?

माझ्या स्वप्नात का येते ती...?

जवळ नसताना आभास घडवते ती..
तिच्या शब्दांचा भास घडवते ती..
माझ्या स्वप्नात का येते ती...?

समोर नसताना जाणवतो तो स्पर्श तिचा
हहवासा वाटतो मंद सहवास तिचा
का कळेना माझ्या स्वप्नात का येते ती...

लिहताना जपावे...

लिहताना जपावे ते अक्षर मतातले ,

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले ,

बोलताना जपावे ते शब्द ओठातले ,

आणि हसताना विसरावे दुख जिवनातले ...

असं फक्त प्रेम असंत...

असं फक्त प्रेम असंत...

त्याला हृदयातचं जपायचं असतं
सुखाचा महासागर, दुःखाचा डोंगर
हास्याचा फुलोरा, कोसळणारा अश्रुंचा मनोरा
फुलपाखरासारखं चंचल, दगडासारखं अचल
असं फक्त प्रेम असंत...

प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो
प्रेमात गुलाम असतो
पण राबवायचा नसतो
असं फक्त प्रेम असंत...

नेहमीच एकट्याचं असतं
पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं
कळत नकळत कसं होतं
ते मात्र कधीच कळत नसतं
असं आणि असं फक्त प्रेमच प्रेमच असतं...

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर...

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत
कुणाची तरी हवी असते...
पण असे का घडते कि जेव्हा
ती व्यक्ती हवी असते...

तेव्हाच ते आपल्या जवळ नसते ?
असे म्हणतात कि प्रेम शोधून सापडत नसते...

प्रेम हे नकळत होऊन जाते
मग तरी देखील प्रत्तेक व्यक्ती
प्रेमाच्या शोधात का असते...?

असे म्हणतात कि प्रेमात पडल्यावर सर्व
काही सुंदर असते...
तरीदेखील प्रेमात पडल्यावर
अश्रूंना का स्थान असते..

हे सर्व काही असले तरी
प्रेम हे अतिशय सुंदर असते...
पण काही जणांना ते
शोधून हि सापडत नसत...