Sunday, July 6, 2014

आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला…
आवडेल मलाही पाऊस व्हायला…
न सांगता तुझ्या भेटीला यायला …
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला…
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला…
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला…

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
गंध होऊनी श् ‍वासात तुझ्या मिसळायला …
श्‍वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला…
काळ्या ढगांमधून पळून यायला…
अलगद तुझ्या कुशीत शिरायला…

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
नकळत हृदयात तुझ्या शिरायला …
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला ..
तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला ..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला…
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला…
आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला…
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला…

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला…
एकट्या मनाची सोबत करायला …
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला…
भाळशील का तू माझ्या या रुपाला सांग ना जमेल का तुला साथ द्यायला…
तरच आवडेल मला पाऊस व्हायला…

Friday, July 4, 2014

ह्या जगात खरच प्रेम असते का...

ह्या जगात खरच प्रेम असते का...

कधी कोण कोणासाठी झुरत का?
मग का तुटतात अचानक नाती.
मग का होतात मने वेगवेगळी
प्रेमाच्या नात्याला तितके महत्व नसते का?
कधी इज्जतीची पर्वा न करता,
घर सोडून पळतात.
कधी इज्जतीची पर्वा करत,
प्रेमाचा बळी देतात.
प्रेम हेच सर्व शिकवते का?

कधी प्रेम नाही मिळालं तर स्वतः मरतात.
कधी आपल्या प्रेमावर acid फेकतात.
प्रेम इतके निष्टुर असते का?
असे खुप प्रश्न आहेत त्याची उत्तरे नाहीत.
ह्या प्रश्नांची उत्तरे कधी काही असतील का?

ह्या जगात खरच प्रेम असते का...

रात्री जागून विचार करणं...

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं...

हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं...

गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..

तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुख दु:खात आपलं हसणं प्रेम असतं...

तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं ...

खरोखरच अस पण प्रेम असतं...

माझ्या स्वप्नात का येते ती...?

माझ्या स्वप्नात का येते ती...?

जवळ नसताना आभास घडवते ती..
तिच्या शब्दांचा भास घडवते ती..
माझ्या स्वप्नात का येते ती...?

समोर नसताना जाणवतो तो स्पर्श तिचा
हहवासा वाटतो मंद सहवास तिचा
का कळेना माझ्या स्वप्नात का येते ती...

लिहताना जपावे...

लिहताना जपावे ते अक्षर मतातले ,

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले ,

बोलताना जपावे ते शब्द ओठातले ,

आणि हसताना विसरावे दुख जिवनातले ...

असं फक्त प्रेम असंत...

असं फक्त प्रेम असंत...

त्याला हृदयातचं जपायचं असतं
सुखाचा महासागर, दुःखाचा डोंगर
हास्याचा फुलोरा, कोसळणारा अश्रुंचा मनोरा
फुलपाखरासारखं चंचल, दगडासारखं अचल
असं फक्त प्रेम असंत...

प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो
प्रेमात गुलाम असतो
पण राबवायचा नसतो
असं फक्त प्रेम असंत...

नेहमीच एकट्याचं असतं
पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं
कळत नकळत कसं होतं
ते मात्र कधीच कळत नसतं
असं आणि असं फक्त प्रेमच प्रेमच असतं...

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर...

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत
कुणाची तरी हवी असते...
पण असे का घडते कि जेव्हा
ती व्यक्ती हवी असते...

तेव्हाच ते आपल्या जवळ नसते ?
असे म्हणतात कि प्रेम शोधून सापडत नसते...

प्रेम हे नकळत होऊन जाते
मग तरी देखील प्रत्तेक व्यक्ती
प्रेमाच्या शोधात का असते...?

असे म्हणतात कि प्रेमात पडल्यावर सर्व
काही सुंदर असते...
तरीदेखील प्रेमात पडल्यावर
अश्रूंना का स्थान असते..

हे सर्व काही असले तरी
प्रेम हे अतिशय सुंदर असते...
पण काही जणांना ते
शोधून हि सापडत नसत...

Wednesday, May 14, 2014

आठवण...

डोळ्यातले आश्रु मोजता येत नाहीत,

मनातील भावना मापता येत नाहीत,

हे खर आहे कि आठवण खुप येते,

पण...
आठवणी कधी मोजुन ठेवता येत नाहीत...

Tuesday, March 18, 2014

तुझ हसणं मला खुप आवडत...

तुझं हसणं मला खुप आवडतं...

तुला हसताना पाहून,
मलाही हसावसं वाटतं...

तुझ्या मधाळ हसण्याला,
डोळेभरुन पहावसं वाटतं...

हसणचं तुझं असं गोड,
त्यात मिश्रीत व्हावसं वाटतं...

तुझं ते लाजून हसणं,
मनाला माझ्या वेड लावतं...

तू अशीच हसत रहा,
असं सांगावसं वाटतं...

तुझ्या हसण्यानेच मला,
तुझ्यासाठी जगावसं वाटतं...

तू हसतेस इतकी छान,
तुझ्यात गुंतावसं वाटतं...

खरं सांगायच झालच तर,
तुझं हसणं मला खुप आवडतं...

तुझ हसणं..

पावसाच  येणं  अन्
तुझं  खळखळून  हसणं
सारखंच  आहे...,

दवबिंदूच  चमकणं   अन्
तुझं  खळखळून  हसणं
सारखंच  आहे...,

सुर्याच   उगवणं  अन्
तुझं  खळखळून  हसणं
सारखंच  आहे...,

वार्‍याचं   झुलणं   अन्
तुझं   खळखळून  हसणं
सारखंच   आहे...,

मोगर्‍याचं   फुलणं   अन्
तुझं  खळखळून  हसणं
सारखंच   आहे...,

कारण   तु   एक
माझ्या   मनाचं 
खुळ   आहे
भुरळ   पडावी  असं
एक   फुल   आहे...

तु...

शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप बोलणारी...
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही,
फक्त एक नझर पाहताच,
त्याला हि भुरळ पाडणारी....
तू...

कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून घेणारी...
स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी ..
तू...

सुर्याच्याच नकळत,
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घारया डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद करणारी...
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,
नेहमीच वाटायला लावणारी..
तू...

Tuesday, March 11, 2014

चंद्र आज...

चंद्र आज खुप गोड दिसतोय,
पण त्या पेक्षाही खुप गोड तु दिसत अशील...

चंद्र फक्त आज रात्री पुरताच माझ्या सोबतीला असेल,
पण तु पुर्ण जीवन भर माझ्यासोबत अशील...

चंद्राने आज किती ही तेज दाखवल असेल,
पण तुझ्या सौंद्रया पुढे त्याचे तेज ही फिके असेल...

Tuesday, March 4, 2014

पिंपळाच पान जसं...

पिंपळाच पान जस उगवतेवेळी  लाल ग...,
पिंपळाच पान जस उगवतेवेळी  लाल ग...,
लाल ग... सखे तसे तुझे गाल ग...

काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग...,
काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग...,
चाल ग... सखे तसे तुझे बाल ग...

एकटक नजरेची भींतीवरली पाल ग...,
एकटक नजरेची भींतीवरली पाल ग...,
पाल ग... सखे तसे माझे हाल ग...

शब्द तुझे झांगिराच्या तबल्याचे बोल ग...,
शब्द तुझे झांगिराच्या तबल्याचे बोल ग...,
बोल ग... थोड मला सुध्दा बोल ग...

डोळे तुझे खोलवर करी ह्रुदयावर मार ग...,
डोळे तुझे खोलवर करी ह्रुदयावर मार ग...,
मार ग... सखे नुसता मुक्का मार ग...

ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग...,
ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग...,
फोड ग... सखे मला आंबटाची ओढ ग...

नाजुक नाजुक पाकळ्या जशा गुलाबाच्या लाल ग...,
नाजुक नाजुक पाकळ्या जशा गुलाबाच्या लाल ग...,
लाल ग... सखे तशी तु माल ग...

Thursday, January 30, 2014

देवाला विचारले...

एकदा मी स्वप्नात देवाला विचारले...

"तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेऊन जातोस?"

देव म्हणाला,
"मला जी माणसं खुप आवडतात,
ती या भुतलावर मी जास्त वेळ ठेवत नाही...!

मी म्हणालो,
"याचा अर्थ मी तुला आवडत नाही?"

देव म्हणाला,
"तसं नाही रे!
तु पण मला खुप आवडतोस!"

मी म्हणालो,
'मग मी या भुतलावर अजून कसा आहे...?'

देव म्हणाला,
'तु भुतलावर माझ्यापेक्षाही कुणाला तरी जास्त आवडतोस म्हणून आहेस...'

Wednesday, January 22, 2014

मला पण कधी...

मला पण कधी तरी विचार पडतो...

का कधी आयुष्य अस जगाव लागत,
मनात दुख पण ओठावर हसु अणाव लागत,
खुप मनापासुन हवी असते एखादी गोष्ट पण हसत हसत तिला दुर जाताना पहाव लागत...

पण तिला दुर जाताना पाहुण पण आनंद मानावा लागतो;
कारण तीच प्रेम आपल्याच मित्रावर दिसायला लागत...

कोणाशी तरी...

कोणीतरी तासनतास बोलत रहाव,
आणि बोलता बोलता तिच्या नजरेला भिडाव...

तिने लाजुण गालातल्या गालात गोड हसाव,
आणि मी तिझा निरागस चेहरया कधे एक टक पाहत रहाव...

तिने श्वास घ्यावा आणि माझ ह्रुदय धडकाव...
तिचावरच माझं प्रेम तिला न सांगताच कळाव...

मला अशी एखादी कोणी भेटेल का...?
हे बोल माझ्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीतले आहेत...
आवडले असतील तर दुसरया प्रेमासाठी मी तयारच आहे...

तुझी आठवण...

तुझी आठवण येण्यासाठी काळ वेळ लागत नाही,
तीही माझ्या सारखीच आहे तिलाही तुझ्या शिवाय राहवत नाही...
तुझी आठवण आली तरी मला काही करता येत नाही,
तीही माझ्या सारखीच आहे तिलाही तु दिसल्या शिवाय राहवत नाही...
शेवटी ति पण तुझ्या सारखीच आहे कधी ही येते आणि कधी ही जाते...
तरी हि ती मला हवीहवीशी वाटते...

तु माझ्या जिवनात ...

तु माझ्या जीवनात जणु पावसाच्या सरी सारखी आलीस पण तुझ्या प्रेमाची सर माझ्या मनातच राहिली,
जरी मी आज तुझ्या जीवनात नसलो तरी माझ्या प्रेमाची कायम पडतच राहील...

तु आज मला नकार दिलास पण जेव्हा तुला कोणी नकार देईल तेव्हा तुला माझी आठवण नक्की येईल,
जरी तु मला नकार दिलेलास तरी मला त्याची खंत नाही कारण त्यामुळे तरी तुला माझी नंतर आठवण येईल...

तु जगाच्या कोणत्याही कोपरयात अशील तरी माझ्या प्रेमाची उनीव तुला नक्की भासत राहील,
जरी मी जिवंत नसलो तरी माझे हे ह्रुदय फक्त आणि फक्त तुझ्याच साठी धडकत राहील...

Tuesday, January 21, 2014

शब्द माझे...

शब्द माझे असले तरी
वर्णन मात्र तुझे आहे...

ह्र्दय माझे असले तरी
त्यावर हाक्क मात्र तुझाच आहे...

वेडा मी असलो तरी
वेड मात्र तुझेच आहे...

नजुक पाकळ्या...

नजुक पाकळ्या किती सुंदर असतात,
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,
नजरेत भरणारी सर्वच असतात,
पण ह्रुदयात राहणारी माणसं फारच कमी असतात...

Monday, January 20, 2014

असं प्रेम करावं...

असं प्रेम करावं...

थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं...

थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं...

गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा “अरे” करावं,
असं प्रेम करावं...

जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं...

कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच  जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं...

वर वर तिच्या भोळसट पनाची
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते  हे जरूर सांगावं,
प्रेम एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं...

असं प्रेम करावं...
त्यासाठीच आयुष्यात एकदा तरी प्रेमात
पड़ाव...

Saturday, January 18, 2014

मनापासुन प्रेम करणारा...

मनापासुन प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो,
कारण,ते वेड
समजुन घेण्यासाठी
कधी तरी मनापासुन
प्रेम करावे लागते...

विसराव म्हटल तरी...

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही,
दिवस येतात जातात पण मन कुठेच  लागत नाही...

पाऊस पडून गेला तरी,
आठवणीचं आभाळ मोकळं होत नाही...

आठवण आली नाही अस कधी झालच नाही,
आठवयला विसराव लागत,
विसरता मात्र आलच नाही...

तिला सहज...

तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का...?
ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशील का...?

हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...?
ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का...?

गंमत म्हणून तिला विचारलं तू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...?
ती म्हणाली,
पाणावलेल्या डोळ्यांनी नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का...?

सहज म्हणालीस...

सहज म्हणालीस विसरूण जा जे काही आपल्यात घडले,
सांग ना मग कसे विसरु ते क्षण जे आठवण बनुन ह्रुदयात शिरले,
सांग ना कसे विसरु ते शब्द तुझे,
जे नेहमीच या कानात घुमले...

एकशे त्रैचाळीस (iluvu) म्हणताना कशी तु लाजत होतीस,
आणि आज बिंधास्त तु कशी काय i hate u बोलत होतीस...

कसे बदलतात शब्द तुझे,
मला एकदा शब्द बदलायला शिकवुण जा
विसरतो मी तुला फक्त एकच कर,
माझा स्वताचा श्वास सोबत तुझ्या घेऊन जा...

Friday, January 17, 2014

तुझ्या प्रेमाचा सुगंध...

तुझ्या प्रेमाचा सुगंध मला देशील का...?
विसरुन सारे जग माझ्या पाशी येशील का...?
मला तुझे प्रेम हवे आहे तु मला
मरेपर्यंत प्रेम करशील का...?

तुझे येणे...

तुझे येणे मला नेहमी सतावते,
झोप उडुन माझ्या मिठीत येऊण बसतेस,
हसनारया ह्रुदयाला तु जरा संभाळुण ठेव
कारण यालाच जग प्रेम म्हणते...

तुझी आठवण येताना...

तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा देउन जाते...
तुझ्या पैजणांची रुणझुण
कानांमध्ये दाटुन येते,
मी मिटुन घेतो डोळे तेव्हा
तु मिठीत हळुवार भेटुन जाते...
स्वप्नांतले जगणे माझे
वास्तवाचे भान सुटुन जाते,
मनात तुझ्या आठवांचे
पुन्हा रान पेटुन येते...
तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा देउन जाते...

Thursday, January 16, 2014

जन्माला आला आहेस...

जन्माला आला आहेस थोडं जगून बघ,
जीवनात दुःख खुप आहेत जरा सोसून बघ,
चिमुठभर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ,
डाव माडंण सोपं असतं थोडं खेळुण बघ,
जगणं कठिण मरणं सोपं दोन्हीतल्या वेदना झेलून बघ,
जीवन मरण एक कोडं असतं जाता जाता एवढं सोडवून बघ....

Tuesday, January 14, 2014

दुखणार मन...

दुखणार मन...
दुखणार मन आणि गुलाबाचे काटे
यात फरक एवढाच,
की दुखणारया मनाला आवर घालता येत नाही,
आणि गुलाबाला तुझा काटा टोचतो हे सांगता येत
नाही...

Wednesday, January 8, 2014

तु असली कि...तु नसली कि...

तु  असली कि, मी माझ्यात नसतो,
तु नसली कि, मी हरवुन जातो...

तु असली कि, जग सुंदर दिसते,
तु नसली कि, जग नुसतेच दिसते...

तु असली कि, हुरळून जाते,
तु नसली कि, मन होरपळुन जाते...

तु असली कि, वाटत खुप बोलाव,
तु नसली कि, वाटत काय बोलाव...

तु असली कि, वेळ कसा जातो हे कळत नाही,
तु नसली कि, वेळ कमी जातो हे कळत नाही...

तु असली कि, मी मुद्दाम रस्ता विसरतो,
तु नसली कि, मला रस्ता कुठे आठवतो...

तु असली कि, मी खुप भटकतो,
तु नसली कि, मी फक्त भरकत्तो...

तु असली कि, मी मी असतो,
तु नसली कि, मी कुणी नसतो...

Tuesday, January 7, 2014

माझ तुझ्यावर प्रेम नाही...

तु मला मनापासुन आवडतेस
पण माझ तुझ्यावर प्रेम नाही...

तुला पाहावस वाटत
पण माझ तुझ्यावर प्रेम नाही...

तुझ्या सोबत बोलावस वाटत
पण माझ तुझ्यावर प्रेम नाही...

तुझ्यासाठी मी मला विसरेन
पण माझ तुझ्यावर प्रेम नाही...

तुला एक नजर पाहताच मला स्वताहाचा विसर पडतो
पण माझ तुझ्यावर प्रेम नाही...

माझ्या मनातील एका कोपरयात तुझ्यावर खुप प्रेम आहे.
पण तुझा नकार सहण होणार नाही म्हणुन
माझ तुझ्यावर प्रेम नाही...

Monday, January 6, 2014

सर्व म्हणतात...

सर्व म्हणतात कि एकटा आलो होतो
आणि
एकटाच जाणार,
पण खरे हे कि,
दोन लोकनशिवाय कोणी येत नाही
आणि
4 लोकनशिवाय कोणी जात नाही...

स्वप्नांची परी...

स्वप्नांची परी हरवली आहे,
निजेणे पाठ फिरवली आहे,
मिटले डोळे तरी मन जागेच राहते आहे,
वेडी आहे रात्र ही,
आजुण स्वप्नान मगे धवते आहे...

आयुष्य संपण्या अगोदर...

आयुष्य संपण्या अगोदर मला एकदा भेटशील का?
फुल नाही फुलाच्या पाकळी एवढ तरी प्रेम देशील का?
आणि
तेही नाही जमत तर मला कायम चा तरी विसरशील का...?

Sunday, January 5, 2014

माझ्या मनातले...

माझ्या मनातले शब्द
ओठावर कधी आलेच नाहीत,

भाव माझ्या मनातले
तुला कधी कळ्लेच नाहीत...

तुझ्या आठवणीत...

तुझ्या आठवणीत जग कधी
संपत नाही,
भविष्याचा विचार करु म्हंटले
तर भुतकाळ पाठ सोडत नाही...

स्वप्नातील साज घेऊन...

स्वप्नातील साज घेऊन ती आली,
ना सांगताच ती या मनाची झाली,
ह्रुदय आता तिच्या शिवाय धडकेना,
का माझ्या प्रियेला प्रित कळेना...?

गोड गुलाबी...

गोड गुलाबी आणि थोडासा रुसवा,
खुप सारे प्रम आणि थोडसा रागावा,
नको अंतर नको कधी दुरावा,
पावसाला लाजवेल इतका असावा मैत्रिमध्ये ओलावा...

हजारो मैलानचा प्रवास...

हजारो मैलानचा प्रवास करुन
येणारया लाटेची आणि किणारयाची भेट
असते काही क्षनाची...
तितकिच मैत्री असु दे माझ्याशी पण ओध असु दे
हजारो मैलानची...

भाषा प्रेमाची...

भाषा प्रेमाची आज मला कळ्ते आहे,
नकळ्तच मन माझे तुझ्याकधे
वळ्ते आहे,
दुर असुन ही मन मनाशी जुळ्ते आहे,
आठवणी तही सौख्य तुझ्या भेटीचे
मिळते आहे...

प्रेम नाही केलेस...

प्रेम नाही केलेस तरी चालेल
तिरसकार मात्र करु नकोस...

आठवण नाही काधलीस तरी चालेल
मैत्री मात्र विसरु नकोस...

तुझ्यावर प्रेम करतो...

तुझ्यावर प्रेम करतो,
करत राहिन...
तु जरी जीवनाच्या अखेर पर्यंत
नाही भेटलीस
तरी तुझ्या नावाचा जप मात्र करत राहीन...

College चे जीवन...

College चे जीवन Degree पर्यंत...
प्रेमाच जीवन लग्ना पर्यंत...
पण आपली मैत्री 30 Feb पर्यंत...
जेव्हा येईल तेव्हा तोडुन टाकू...

मनात तुझ्या...

मनात तुझ्या नसताना ही
मागे वळून पाहशील का...?

तुझ्याचसाठी थांबलो इथे
दोन शब्द प्रेमाने बोलशील का...?

कसे आहे हे जग...

कसे आहे हे जग
आजुण समजु शकलो नाही...
विखुरलेले स्वप्न
एकवटु शकलो नाही...
कदाचीत मीच वाईट असणार
जे तुझ्या ह्रुदयात उतरु शकलो नाही...

जीवन म्हणजे...

जीवन म्हणजे आळूचा पानावरील दव आहे,
तीकले तर मोती नाही तर माती आहे,
तुझे जीवन नेहमी मोती आसु दे,
आणि हा मोती नेहमी आपल्या मैत्रीच्या शिंपल्यात आसु दे...

प्रेमाच्या हाकेला...

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली,
स्वप्नाना वास्तवाची आस मिळाली,
मन माझ खुदकन हसल...
तुझ्या डोळ्यात जेव्हा माझ प्रेम दिसल...

मन गुंतायला...

मन गुंतायला वेळ लागत नाही,
मन तुटायला वेळ लागत नाही,
वेळ लागतो तो...,
फक्त गुंतलेले मन आवरायला
आणि
तुटलेले मन सावरायला...

तुझे येणे...

तुझे येणे मला नेहमी सतावते
झोप उडाऊन माझ्या मिठीत येऊन बसतेस
हासनारया  ह्रुदयाला  तु जरा संभाळुन ठेव
कारण;
यालाच जग प्रेम म्हणते...

प्रेमाची घंटा...

प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही
पण
ओट हालत नाहीत,
तुझी आठवण आठवण आली
कि मग काही सुचतच नाही...

प्रेम आणि सौंदर्य...

प्रेम आणि सौंदर्य यांची घडन
परमेश्वराने एकाच साच्यातुण केली आहे,
फरक एवढाच कि,
सौंदर्य डोळ्यात आहे आणि
प्रेम ह्रुदयात आहे...

चेहरा तिचा...

चेहरा तिचा सुंदर होता,
एकच केस भुरकट होता,
ओठाला जाऊन भिडत होता,
माझ्या पेक्षा तो खुप भाग्यवान होता...

जे...

जे "कठीण" आहे ते "सोपे" करावे,
जे "सोपे" आहे ते "सहज" करावे,
जे "सहज" आहे ते "सुंदर" करावे,
आणि
जे "सुंदर" आहे त्यावर मनापासुन "प्रेम" करावे...

मैत्री करण्याचा...

मैत्री करण्याचा अंदाज पाहीजे,
आठवण येण्याचे कारण पाहीजे,
तु Call कर किवा नको कर,
पण तुझा एक प्रेमळ Msg कधीतरी यायला पाहीजे...

अवघड होईल...

जागावे असे की मरने अवघड होईल...
ह्सावे असे की रडने अवघड होईल...
कुणाशी ही मैत्री करने सोप्पे आहे,
पण मैत्री टिकवावी अशी की तोडने अवघड होईल...

आपली मैत्री...

आपली मैत्री एक फुल आहे,

ज्याला मी तोडू शकत नाही,

आणि सोडुही शकत नाही,

कारण,

तोडल तर सुकून जाईल आणि

सोडले तर कोनी दुसरा घेवून जाईल...

एक तरी Gf असावी ...

आयुष्यात एक तरी Gf असावी,
फोन वर तासन-तास बडबड करणारी,
"नालायक" म्हणणारी,
Miss-call देऊन आपल्याला Call
करायला लावणारी...

एक तरी Gf असावी,
आपल्या Faltu Joke वर हसणारी
अन आपण रागवल्यावर
मुळु-मुळु रडणारी...

एक तरी Gf असावी,
चोरुन आपल्याला भेटायला
येणारी अन आल्यावर जाण्याची
घाइ करणारी अशी...
एक तरी Gf असावी...