पिंपळाच पान जस उगवतेवेळी लाल ग...,
पिंपळाच पान जस उगवतेवेळी लाल ग...,
लाल ग... सखे तसे तुझे गाल ग...
काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग...,
काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग...,
चाल ग... सखे तसे तुझे बाल ग...
एकटक नजरेची भींतीवरली पाल ग...,
एकटक नजरेची भींतीवरली पाल ग...,
पाल ग... सखे तसे माझे हाल ग...
शब्द तुझे झांगिराच्या तबल्याचे बोल ग...,
शब्द तुझे झांगिराच्या तबल्याचे बोल ग...,
बोल ग... थोड मला सुध्दा बोल ग...
डोळे तुझे खोलवर करी ह्रुदयावर मार ग...,
डोळे तुझे खोलवर करी ह्रुदयावर मार ग...,
मार ग... सखे नुसता मुक्का मार ग...
ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग...,
ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग...,
फोड ग... सखे मला आंबटाची ओढ ग...
नाजुक नाजुक पाकळ्या जशा गुलाबाच्या लाल ग...,
नाजुक नाजुक पाकळ्या जशा गुलाबाच्या लाल ग...,
लाल ग... सखे तशी तु माल ग...
या कवितेचे कवी कोण आहेत
ReplyDeleteकवी केशव खटींग
Delete