पावसाच येणं अन्
तुझं खळखळून हसणं
सारखंच आहे...,
दवबिंदूच चमकणं अन्
तुझं खळखळून हसणं
सारखंच आहे...,
सुर्याच उगवणं अन्
तुझं खळखळून हसणं
सारखंच आहे...,
वार्याचं झुलणं अन्
तुझं खळखळून हसणं
सारखंच आहे...,
मोगर्याचं फुलणं अन्
तुझं खळखळून हसणं
सारखंच आहे...,
कारण तु एक
माझ्या मनाचं
खुळ आहे
भुरळ पडावी असं
एक फुल आहे...
No comments:
Post a Comment