Wednesday, January 8, 2014

तु असली कि...तु नसली कि...

तु  असली कि, मी माझ्यात नसतो,
तु नसली कि, मी हरवुन जातो...

तु असली कि, जग सुंदर दिसते,
तु नसली कि, जग नुसतेच दिसते...

तु असली कि, हुरळून जाते,
तु नसली कि, मन होरपळुन जाते...

तु असली कि, वाटत खुप बोलाव,
तु नसली कि, वाटत काय बोलाव...

तु असली कि, वेळ कसा जातो हे कळत नाही,
तु नसली कि, वेळ कमी जातो हे कळत नाही...

तु असली कि, मी मुद्दाम रस्ता विसरतो,
तु नसली कि, मला रस्ता कुठे आठवतो...

तु असली कि, मी खुप भटकतो,
तु नसली कि, मी फक्त भरकत्तो...

तु असली कि, मी मी असतो,
तु नसली कि, मी कुणी नसतो...

No comments:

Post a Comment