असं प्रेम करावं...
थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं...
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं...
गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा “अरे” करावं,
असं प्रेम करावं...
जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं...
कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं...
वर वर तिच्या भोळसट पनाची
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते हे जरूर सांगावं,
प्रेम एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं...
असं प्रेम करावं...
त्यासाठीच आयुष्यात एकदा तरी प्रेमात
पड़ाव...
No comments:
Post a Comment